पप्पूंनी आता लग्न करुन पप्पा बनावं, रामदास आठवलेंचा राहुल गांधींना सल्ला

union minister ramdas athawale said rahul gandhi is no more a pappu now has become a pappa | पप्पूंनी आता लग्न करुन पप्पा बनावं, रामदास आठवलेंचा राहुल गांधींना सल्ला 

ठाणे : रायगड माझा वृत्त 

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसनं मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्ता स्थापन केली आहे. या तीन राज्यांत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर राहुल गांधींच्या नेतृत्व कौशल्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बराच बदलला आहे. एका परिपक्व राजकीय नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते आहे. यासंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकतेच एक विधान केले आहे.

काय म्हणाले रामदास आठवले?

राहुल गांधींनी तीन राज्यांमध्ये चांगला विजय मिळवला आहे. ते आता पप्पू राहिले नाहीत,आता ते पप्पा बनले आहेत, असे विधान रामदास आठवले यांनी केले आहे. राहुल गांधी यांना पप्पू म्हटलं जायचे. पण त्यांनी आता पप्पू नाहीतर पप्पा बनलं पाहिजे, माझा त्यांना हा सल्ला आहे. पप्पा होण्यासाठी त्यांनी लवकर लग्न केले पाहिजे. तुम्हाला राज्यांतील निवडणुकांमध्ये यश मिळाले आहे. राहुल गांधींनी लवकर लग्न करावं आणि पप्पा बनण्याचं काम करावं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केला बचाव
तीन राज्यांमध्ये भाजपाच्या झालेल्या पराभवाबाबत आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचाव करत म्हटले की, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाचा झालेला पराभव हा मोदींचा पराभव नाही. तर हा भाजपाचा पराभव आहे.

शिवसेनेला दिला हा सल्ला
शिवसेनेनं भाजपासोबत युती तोडू नये, असा सल्लाही आठवले यांनी यावेळेस दिला. जर युती कायम न राहिल्यास शिवसेनेला यामुळे नुकसान होईल. उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणुका लढण्याबाबत विचार करू नये.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत