पबजीचे फॅड – तरुणाई झालेय मॅड ; गेम्सच्या अतिवापरामुळे तरुणाई मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता

खोपोली : समाधान दिसले

गुगल प्ले स्टोअरवर यंदा सर्वोत्कृष्ट ठरलेल्या पबजी गेमने तरुणांसह शालेय विद्यार्थ्यांनाही अक्षरशः वेड लावले आहे. फेसबुक आणि यूट्यूबवर गेम प्ले लाइव्ह करून खेळणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काही तरुण तर दिवस – रात्रभर हा खेळ खेळताना दिसत असल्याने या गेमच्या अति वापरामुळे तरुणाचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असून यामुळे तरुणाई वर्गाचे मानसिक संतुलन बिघडण्याची चिन्हे उभी राहिल्याने पालक वर्गापुढे मोठा प्रश्न चिन्ह उभा राहिल्याने सर्व जण चिंतेत सापडले आहे. त्यामुळे शासनाने या गेम्सवर बंदी घालावी अशी मागणी सध्या पालक वर्गातून जोर धरताना दिसत आहे.
सध्या सर्वत्र पबजी गेमचे फॅड इतके पसरले आहे. की तो कसा खेळावा, शेवटपर्यंत जिवंत कसे राहावे, खेळातले वेगवेगळे मिशन्स कसे पार करावेत, अशा गोष्टींची माहिती इतरांना करून देण्यासाठी अनेक गेमर्सनी स्वतःचे गेमप्ले लाइव्ह करण्यास सुरवात केलेली आहे. आपल्या गेमप्लेला जास्त व्ह्यूज येण्यासाठी हे खेळाडू तासन्‌ तास आपला गेमप्ले लाइव्ह करत आहेत. या लाइव्हलाही कमेंट्‌स, लाइकच्या माध्यमातून तरुणाईचा प्रतिसाद मिळत आहे. वाढत्या लोकप्रियतेमुळे यंदा प्ले-स्टोअरवर पबजी हा सर्वोत्कृष्ट गेम ठरला आहे. गेम खेळणाऱ्यांची वाढती संख्या पाहून हा गेम कदाचित पुढचा ‘ब्लू व्हेल’ तर ठरणार नाही ना, अशी भीती पालकांकडून व्यक्त होत आहे.

पबजी गेम हिंसकतेकडे झुकत असल्याने त्याचा परिणाम मुलांवर होत आहे. गेम खेळून मुलांचा स्वभाव आक्रमक होत असल्याने आणि गेम खेळू न दिल्यास पालक आणि मुलांमधील नात्याला ठेचही पोचत आहे. तसेच अभ्यास व खेळांकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत. पबजी गेममुळे मानसिक संतुलन बिघडणे, अभ्यास – खेळाकडे दुर्लक्ष, जागरणामुळे झोप विस्कळित, आहाराकडे दुर्लक्ष , व्यायामाकडेही दुर्लक्ष, मोबाईल – लॅपटॉपच्या वापरामुळे डोळ्यांना त्रास असे अनेक शारीरिक आजार तरुणाई जडण्याची शक्यता वर्तवली जात असुन याचा नाहक त्रास तरुणाईला मानसिक संतुलन बिघडवण्यात कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे या गेमच्या अतिवापराचा त्रास तरुणाईसह पालक वर्गाला सहन करावा लागत आहे.
शासनाने या गेम बंदी न घातल्यास येणाऱ्या काळात तरुणाईला ही गेम धोक्याची घंटा देण्याची शक्यता काही जाणकार व्यक्ती व्यक्त करीत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत