पबजीवर बंदी घाला, ११ वर्षांच्या विद्यार्थ्याची मागणी

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for kids playing pubg game

शालेय विद्यार्थ्यांना आणि महाविद्यालयीन तरुणांना वेड लावणाऱ्या पबजी या ऑनलाइन खेळावर बंदी घालण्याची मागणी करणारं पत्र मुंबईच्या ११ वर्षांच्या अहद नियाझ याने केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लिहिलं आहे. पबजीमुळे मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत असल्याचं त्यानं या पत्रात म्हटलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पबजी या ऑनलाइन गेमनं मुलांना वेड लावलं आहे. या गेममुळं मुलं हिंसक होत असून त्यांच्या मनात वाईट विचार रुजत आहेत. यामुळं या गेमवर बंदी आणावी, अशी मागणी ११ वर्षांच्या अहद नियाझनं केली आहे. या खेळामुळं अनेक जण रात्रभर झोपतही नाहीत. पबजीचं व्यसन हा एका प्रकारचा मानसिक आजार असल्याचं मनोवैज्ञानिक डॉ. हरीश शेट्टी यांचं मत आहे. दरमहा पबजीमुळं १०-१५ तरुण मानसिक रुग्ण होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

…तर याचिका दाखल करू

अहदच्या पत्राला सरकारकडून उत्तर न मिळाल्यास मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी त्याची आई मरियम नियाझ यांनी केली आहे. मरियम नियाझ पेशानं वकील आहेत. ‘सरकारनं पत्राची दखल घेतली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू. हा खेळ तरुणांसाठी घातकच आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत