पबजी खेळण्याच्या नादात पाण्याऐवजी प्यायला अॅसिड

भोपाळ : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for pubg

पबजी या गेमचे व्यसन लागल्याने अनेकांचा विचित्र प्रकारे मृत्यू झाल्याच्या काही बातम्या आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना आता मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. येथील छिंडवाडामधील एक तरुण पबजी गेम खेळता खेळता पाण्याऐवजी चक्क अॅसिड प्यायल्याने गंभीर जखमी झाला आहे.

छिंदवारा येथे राहणाऱा हा तरुण विवाहीत असून त्याला एक मुलगाही आहे. तसेच तो एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. उठता बसताना ,काम करताना, जेवताना, झोपताना अगदी रस्त्यावरून चालतानाही तो मोबाईलवर गेम खेळतो. गेल्या महिन्यात असाच तो घरातील अंगणात मोबाईलवर पबजी खेळत होता. खेळण्यात तो इतका दंग झाला की अंगणातली जमीन स्वच्छ करण्यासाठी ठेवलेले अॅसिडची बाटली त्याने पाणी समजून उघडली व अॅसिड तो घटाघटा प्यायला. त्यानंतर मात्र त्याला आपली चूक समजली. पण तोपर्यंत उशीर झाला होता.

अॅसिडमुळे त्याच्या तोंडापासून पोटापर्यंतची त्वचा भाजली होती. आतड्यांना गंभीर दुखापत झाली होती. पोटात अनेक अल्सर निर्माण झाले होते. अखेर त्याला छिंदवारा येथून नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. पण तिथे त्याची प्रकृती आणखीनच खालावली. यामुळे त्याला पुन्हा छिंदवारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिन्याभराच्या उपचारानंतर त्याच्या प्रकृतित सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

पबजी खेळण्याच्या नादात अनेक मुले जखमी झाल्याचे प्रकार घडल्यानंतर आता पबजी बनवणाऱ्या चीनच्या टेनसेंट कंपनीने या गेम्सवर डिजीटल लॉकच्या माध्यमातून नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतला आहे. या डिजीटल लॉकमुळे आता या कंपनीने बनवलेले काही गेम खेळण्यासाठी खेळाडूचे वय १३ वर्षांहून अधिक असणे बंधनकारक असणार आहे. डिजीटल लॉकचे फिचर सध्या ‘ऑनर ऑफ किंग्स’ आणि ‘पबजी मोबाइल’ मोबाइल गेम्ससाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सरकारने अशाप्रकारच्या जीवघेण्या गेम्सवर निर्बंध आणण्यासाठी कठोर नियम बनवणार असल्याचे जाहीर केले होते. पबजी आधी ब्लू व्हेल गेममुळे अनेकांना प्राण गमावले आहेत. गेम्सच्या आहारी गेलेल्या तरुणांना आजूबाजूच्या स्थितीचे भान राहत नसल्याने अनेकदा गेम खेळताना होणाऱ्या अपघातांमधून अनेकांना जीव गमावावा लागतो.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत