परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यात शेत पिकासह केले घरांचे नुकसान

नेरळ : अजय गायकवाड 

माहिन्याभराच्या विश्रात्ती नंतर शुक्रवारी अचानक सायंकाळी वादळी वार्यासह पडण्याऱ्या पावसाने  कर्जतकरांना चांगलंच झोडपून काढलं. या वादळी पावसात नेरळमध्ये वीज पडल्याने नारळाचे झाड जाळले होते. तर काही ठिकाणी शेतपिकांचे मोठे नुकसान झाले होते. 

कर्जत तालुक्यातील गुडवन येथील नारायण खडे व अशोक खडे यांच्या शेतातील उभे पिक आलेल्या वादळी पावसाने पूर्णपणे आडवे केले आहे.  संदेश खडे यांच्या बांधलेल्या नवीन घराचे छप्परच देखील उडून गेले गेले. हे उडून गेलेले छप्पर नानार तुकाराम खडे यांच्या घरावर जाऊन पडले आहे, या मध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी येथील रहिवासी भानुदास खडे यांच्या दुकानावर झाड उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे..त्याच प्रमाणे गावातील काही मंदिरांचे सुद्धा पत्रे उडाली आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत