परदेशी स्थायिक होण्यासाठी चक्क सख्ख्या भावाशी केलं लग्न

बठिंडा : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for shadi pics

परदेशी स्थायिक होण्यासाठी कित्येक लोक नाना प्रकारच्या क्लृप्त्या आजमावतात. पण, पंजाबमधील एका तरुणीने परदेशी स्थायिक होण्यासाठी चक्क स्वतःच्या सख्ख्या भावाशी विवाह केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाबमधील बठिंडा येथे राहणाऱ्या एका तरुणीला ऑस्ट्रेलियात स्थायिक व्हायची इच्छा होती. मात्र, व्हिजा आणि तिथे रहिवास करण्याचा प्रश्न होता. त्यामुळे तिने कुटुंबीयांसमवेत एक बेत आखला. तिच्या आजीने ती आपली मुलगी असल्याचं खोट प्रतिज्ञापत्र बनवलं. त्यानंतर तिने आपल्या मावशीच्या मुलीच्या पासपोर्टवर स्वतःचा फोटो लावला आणि स्वतःच्या सख्ख्या भावाशी विवाह करून ऑस्ट्रेलियाला निघून गेली.

हा प्रकार तिच्या मावशीमुळे उघडकीस आला. रणवीर कौर या महिलेने आपली मावशी जसविंदर कौर, तिची मुलगी अमनदीप कौर आणि मावशीचा नवरा बुटा सिंह यांच्याविरोधात फसवणुकीचे आरोप दाखल केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, तिची मावशी जसविंदर, तिची मुलगी अमनदीप यांनी तिच्या पासपोर्टचा दुरुपयोग केला. त्यांनी फसवणुकीने तिला त्यांच्या बँकेच्या खात्यात भागीदार बनवलं आणि बँकेच्या रेकॉर्डवर अमनदीप हिचा फोटो लावला. हाच प्रकार त्यांनी पासपोर्टसोबत केला.

अशाप्रकारे खोट्या कागदपत्रांच्या साहाय्याने अमनदीप सध्या सख्ख्या भावाशी विवाह करून ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवत जसविंदर कौरच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत