परभणीत कचऱ्यात स्पोट, एक जण जखमी

परभणी :रायगड माझा वृत्त 

पेटवलेल्या कचऱ्यात स्फोट होऊन एक जण जबर जखमी झाल्याची घटना शहरातील नांदखेडा रोडवर दुपारी साडे बारा वाजता घडली.

परभणी येथील नांदखेडा रोडवर संत नरहरी महाराज मंदिर च्या बाजूस घरबांध कामाचा मलबा आणून टाकला होता. त्या ठिकाणी एकाने कचरा पेटवला होता. या कचऱ्याच्या बाजूला संजय अग्रवाल यांची विट भट्टी आहे. कचरा ज्या ठिकाणी होता. त्या ठिकाणी संजय अग्रवाल उभे होते. त्यावेळी अचानक स्फोट झाला. यात ते जबर जखमी झाले आहेत, त्याच्यावर जिल्ह्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत