परभणीत लाच मागितल्याप्रकरणी मनसेच्या शहराध्यक्षाला अटक

परभणी : रायगड माझा ऑनलाईन 

लाच मागितल्याप्रकरणी परभणीतील मनसेच्या शहराध्यक्षाला अटक करण्यात आली आहे. शहराध्यक्ष सचिन पाटील याने रेल्वेतील पॅन्ट्री चालकाकडे लाच मागितल्याचा आरोप आहे. औरंगाबाद लोहमार्ग पोलिसांनी कारवाई करत सचिन पाटीलला अटक केली. याप्रकरणी एकजण फरार आहे.

तपोवन एक्स्प्रेसमध्ये जास्त दराने खाद्य पदार्थ विकले जात असल्याविरोधात मनसेकडून आंदोलन करण्यात आलं होतं. ऑक्टोबर महिन्यात मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केलं होतं. यानंतर मनसेचा शहराध्यक्ष असणाऱ्या सचिन पाटीलने रेल्वेतील पॅन्ट्री चालकाकडे एक ते दोन लाखांची लाच मागितली होती.

सचिन पाटीलने लाच मागितल्यानंर तपोवनमधील पॅन्ट्री सुपरवायझर अशोक राठोड यांनी लोहमार्ग पोलिसांत तक्रार केली. यानंतर सचिन पाटीलला अटक करण्यात आली असून एकजण फरार आहे. न्यायालयाने सचिन पाटीलला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत