परमबीर सिंग यांची अखेर उचलबांगडी; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

सचिन वाझे प्रकरणावरून ठाकरे सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांना बदलण्याची चर्चा सुरु होती.या साऱ्या पार्शभूमीवर काल मध्यरात्रीपर्यंत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पाडली. बैठकीला पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परबही उपस्थित होते. या बैठकीमध्ये सचिन वाझे प्रकरणावर मध्यरात्री १२ पर्यंत चर्चा पार पडली. तर आज गृहमंत्राच्या बंगल्यावर याप्रकरणी बैठक पार पडली असून मुंबई पोलीस दलात मोठा बदल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून या बाबत माहिती दिली आहे. दरम्यान रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी दिली आहे. तर परमबीर सिंह यांच्याकडे गृहरक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत