परळच्या क्रिस्टल टॉवरमधील आगीत दोन नागरिकांचा मृत्यू

मुंबई : रायगड माझा वृत्त 

परळमधील क्रिस्टल टॉवरमध्ये आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली असून टॉवरच्या १२ व्या मजल्यावर ही आग लागली. जवळपास दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. इमारतीत अडकलेल्या १० ते १२ जणांची सुटका करण्यात आली असून आग नेमकी कशामुळे लागली हे अजूनही समजू शकलेले नाही.

परळमधील क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्यावर बुधवारी सकाळी साडे आठच्या सुमारास आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा स्थानिकांचा दावा आहे. पण याबाबत अग्निशमन दलाने दुजोरा दिलेला नाही. तपासानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अग्निशमन दलाचे १० हून अधिक बंब घटनास्थळी पोहोचले आहेत.घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत