परिक्षा देण्यासाठी आलेल्या नातेवाईकाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

पुणे : रायगड माझा ऑनलाईन 

Image result for rape

परीक्षा देण्यासाठी आलेल्या नातेवाईकानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित आरोपी फरार झाला असून त्याचा शोध वाकड पोलीस घेत आहेत. पीडित मुलीच्या आईने त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा सोलापूर येथे राहण्यास असून तो फिर्यादी यांचा नातेवाईक आहे. पिंपरी-चिंचवड शहरात त्याची कुठल्या तरी विषयाची परीक्षा होती, यासाठी तो फिर्यादी यांच्या घरी आला होता. दरम्यान,गुरुवारी पीडित मुलीचे आई-वडील कामावर गेले होते. याचाच गैरफायदा घेत आरोपीने दुपारी बाराच्या सुमारास दरवाज्याची आतून कडी लावत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.

घटनेचे गांभीर्य ओळखून तो सोलापूर येथे फरार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आई घरी आल्यानंतर अल्पवयीन मुलीने घडलेली घटना आईला सांगितली असून त्यांनी वाकड पोलीस ठाणे गाठत आरोपी नातेवाईकाविरोधात फिर्याद दिली आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोगम हे करत आहेत.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत