पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी अश्वपालकांना हेल्मेट वाटप!

माथेरान : मुकुंद रांजाणे 
माथेरानमध्ये मागील काळात घोड्यावर बसणाऱ्या नवख्या पर्यटकांची अपघातात जखमी होण्याची संख्या नाममात्र असली तरीसुद्धा त्यांच्या सुरक्षेसाठी घोडेस्वारी करणाऱ्या पर्यटकांना पोलीस प्रशासनाने हेल्मेटसक्ती केल्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती हालाख्याची आहे. याकामी त्यांना एक मदतीचा हातभार लावावा या निस्वार्थ दृष्टिकोनातून येथील प्रसिद्ध उद्योजक आणि रुबी हॉल बंगल्याचे मालक समीर बांदेकर यांनी दि.८ मे रोजी अश्वपालकांना हेल्मेटचे मोफत वाटप नगरपालिका गटनेते प्रसाद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत केले.
बहुतेक वेळा पर्यटक हे घोडेस्वारी करतांनाच घोडेवाल्यांना सोबत घेण्यास टाळाटाळ करून स्वतःच घोडा चालविण्याचा प्रयत्न करीत असतात अशावेळेस जर घोडा बेकाबू झाल्यास घोड्यावरून पडून अपघात होतात. अशावेळेस घोडेवाल्यांना जबाबदार धरले जाते. यासाठी घोडेस्वारी करणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने हेल्मेट परिधान केल्यास निदान अनावधानाने अपघात झालाच तर त्यांचे प्राण वाचू शकतात. सुरुवातीला येथील धनगर समाजाचे अध्यक्ष अश्वपालक राकेश कोकळे यांनी स्वताच्या खर्चाने दोन हेल्मेट खरेदी केले होते. हेल्मेट हे प्रत्येक घोडेस्वाराने सोबत ठेऊन पर्यटकांची वर्दी आल्यास त्यांना देण्यात यावेत. असे पोलिस ठाण्यात एका महत्वपूर्ण सभेत ठरले होते.त्यानुसार उद्योजक समीर बांदेकर यांनी सर्वसामान्य अश्वपालांसाठी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी स्वखर्चाने पहिल्या टप्प्यात १०० हेल्मेट्स देेणगी दाखल दिल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात २५० आणि तिसऱ्या टप्प्यात एकूण सहाशे हेल्मेट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कुठलाही गाजावाजा न करता त्यांनी त्यांच्या एको पॉईंट येथील बंगल्या समोर हा कार्यक्रम केला घोड्यावर बसलेल्या पर्यटकांना हेलमेट देण्यात आल्या या वेळेस अश्वपाल संघटनेचे अध्यक्ष शैलेश शिंदे, सचिन पाटील, प्रकाश मोरे, अरविंद रांजाणे, हैदर शेख, विकास रांजाणे, बाबू रांजाणे, श्रेयस गायकवाड, नरेंन महामुनकर आणि इतर अश्वपालक उपस्थित होते. बांदेकर यांनी हा सेवाभावी स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी त्यांचे विशेष आभार मानले असून सर्वच स्तरांतून समीर बांदेकर यांचे कौतुक होत आहे.
———————————————————
माथेरान हे माझे सर्वात आवडते पर्यटनस्थळ आहे. इथल्या सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या बद्दल खूप आस्था असून त्यांच्यासाठी काहीतरी करावे ही भावना मी इथे बंगला घेतल्यापासून होती त्याप्रमाणे आम्ही हा उपक्रम राबविला आहे यापुढेही इथल्या सर्वसामान्य लोकांना वेळोवेळी मदतीचा हातभार लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत
समीर बांदेकर, रुबी हॉल बंगलाचे मालक 
———————————————————
माथेरान मध्ये अनेक दिग्गजांचे बंगले हॉटेल्स आहेत अशा सर्वांनी इथल्या गरजवंताला,शालेय विद्यार्थ्यांना तसेच निराधार वयोवृद्ध मंडळींनाही मदतीचा हातभार लावल्यास एक सेवाभावी आणि स्तुत्य उपक्रमा बरोबरच सत्कर्म त्यांच्या हातून घडू शकते.
प्रसाद सावंत, गटनेते माथेरान नगरपालिका
शेयर करा

One thought on “पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी अश्वपालकांना हेल्मेट वाटप!

  1. समीर बांदेकर हे एक दयाळू अंतःकरणाचे, दानशूर आणि समाजसेवी वृत्तीचे उद्योजक आहेत हे या बातमी वरुन दिसून येते. ईतकी साधी वाटणारी पण अत्यावश्यक असलेली बाब अनेकांच्या ध्यानात आलेली नव्हती ती बरोब्बर हेरुन त्यांनी त्वरीत त्यावर उपाययोजना केली. अशा लोकांची खरंच समाजाला गरज आहे. अशी सेवाभावी वृत्तीची माणसं आज काल दुर्मिळ होत चाललेली आहेत. त्यांच्या या कार्याला माझा सलाम.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत