पर्यटकांसाठी खुशखबर : पावसाळ्यातही माथेरान मिनी ट्रेन ची शटल सेवा सुरु राहणार 

पावसाळ्यातही माथेरान मिनी ट्रेनची शटल सेवा सुरु राहणार

माथेरान : रायगड माझा वृत्त 

लाखो अबालवृद्ध पर्यटकांचे माथेरान हे आवडते पर्यटन स्थळ .. माथेरानची झुकझुक गाडी तर माथेरानचे विशेष आकर्षण . आता या  मिनीट्रेन ची अमन  लॉज स्थानक ते माथेरान दरम्यानची शटल सेवा पावसाळ्यातदेखील सुरु राहणार आहे. मात्र नेरळ ते माथेरान दरम्यान धावणारी एक गाडी पावसाळ्यात बंद असणार आहे. 

लाखो अबालवृद्ध पर्यटकांचे माथेरान हे आवडते पर्यटन स्थळ…माथेरानची झुकझुक गाडी तर माथेरानचे विशेष आकर्षण. आता या मिनीट्रेनची अमन लॉज स्थानक ते माथेरान दरम्यानची शटल सेवा पावसाळ्यातदेखील सुरु राहणार आहे. मात्र नेरळ ते माथेरान दरम्यान धावणारी एक गाडी पावसाळ्यात बंद असणार आहे.

माथेरानची मिनीट्रेन हा माथेरानच्या पर्यटनाचा श्वास आहे. डोंगरदऱ्यातून नागमोडी वळणे घेत धावणारी ही ट्रेन माथेरानच्या पर्यटनाचं विशेष आकर्षण आहे. सध्या दररोज सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी एक गाडी नेरळवरून माथेरानकडे निघते आणि शुक्रवारी सकाळी अजून एक अतिरिक्त गाडी सकाळी ९ वाजता माथेरानच्या दिशेने निघते. मात्र पावसाळ्यात आता ११ जून पासून नेरळवरून माथेरानच्या दिशेने आणि माथेरानवरून नेरळच्या दिशेने होणारी प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

यात आनंदाची गोष्ट म्हणजे अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटलसेवा मात्र नियमित सुरु ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय. पाऊस अंगावर झेलत पावसाळी पर्यटनासाठी माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची संख्या अलीकडे वाढली असून या सर्व पर्यटकांना आणि माथेरानकरांना देखील या शटलसेवेचा पावसाळ्यात मोठा उपयोग होणार आहे.

 

 • अमान लॉज स्थानकातून माथेरानसाठी  शटल सेवेचे वेळापत्रक 
 • शनिवार, रविवार,सोमवार : सकाळी ८. वाजून ४० मिनिटांनी
 • दररोज :  सकाळी ९ वाजून ०२ मिनिटांनी,  सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी,  सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी
 • फक्त शुक्रवारी : सकाळी ११. ३० वाजता
 • दररोज  :  ११ वाजून ५५ मिनिटांनी , दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी , दुपारी २ वाजता ,दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी
 • शनिवार, रविवार,सोमवार  : सायंकाळी ४ वाजून २५ मिनिटांनी , ५ वाजून १५ मिनिटांनी, ६ वाजून ०५ मिनिटांनी
_______________________________________________________________________________________
 • माथेरानवरून अमन लॉज स्थानककडे जाणाऱ्या शटलचे वेळापत्रक 
 • शनिवार , रविवार ,सोमवार  : सकाळी ८. वाजून १५ मिनिटांनी
 • दररोज : सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी ,  सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी,  सकाळी १० वाजून २० मिनिटांनी ,
  ११ वाजून १० मिनिटांनी , दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी , दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी  ,
 • फक्त सोमवारी :  दुपारी २ वाजून २० मिनिटांनी, दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी ,दुपारी ३ वाजून ४०
 • शनिवार , रविवार ,सोमवार  : सायंकाळी ४ वाजता , ४ वाजून  वाजून ५०मिनिटांनी , वाजून ४० मिनिटांनी
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत