पलूस चा संग्राम टळला … विश्वजीत कदम बिनविरोध

सांगली : रायगड माझा

काँग्रेसचे नेते डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस-कडेगावसाठी विधानसाभेची पोटनिवडणूक घेण्यात येणार होती. पण, भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांनी माघार घेतल्याने पलूसची निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे विश्वजीत कदम यांची आमदार म्हणून निवड निश्चित झाली आहे. याबाबतची औपचारिक घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून केली जाईल.

 पलूस-कडेगावच्या भाजपच्या संग्रामसिंह देशमूख यांच्यात लढत होणार होती. काँग्रेसने पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम यांना तर भाजपने भाजपच्या संग्रामसिंह यांना उमेदवारी दिली होती. भाजपच्या संग्रामसिंह यांनी माघार घेतल्याची घोषणा आज महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कडेपूर येथे पत्रकार परिषदेत केली.

या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिह देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख,आमदार सुधीर गाडगीळ,मकरंद देशपांडे,निशिकांत पाटील,राजाराम गरुड आदी उपस्थित होते.

 

 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत