पळशी गावच्या ग्रामस्थांची वॉटर कप साठी जय्यत तयारी..

सातारा : रायगड माझा 

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पळशी (स्टे) हे गाव यंदा पानी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले आहे. स्पर्धेचा अंतिम टप्पा सध्या सुरु असून गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने श्रमदान करून स्पर्धेसाठी जय्यत तयारी करत आहेत. आज महाश्रमदानाचा शेवटचा दिवस होता, त्यासाठीही ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने श्रमदानासाठी हजेरी लावली होती. स्पर्धेत यश संपादन करणारच असा पळशी ग्रामस्थांचा निर्धार आहे. गावातील लहान मुलांपासून ते वयस्कर आजोबांपर्यंत सर्व जण श्रमदानात उत्साहाने सहभागी झाले होते. पळशी गावच्या ग्रामस्थांनी संयोजक पानी फाऊंडेशन यांचे आभार मानले आहेत. 

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत