पश्चिम बंगालच्या नामांतराचा ठराव विधानसभेत मंजूर

रायगड माझा वृत्त 

कोलकाता – पश्चिम बंगाल विधानसभेत राज्याच्या नामांतरचा ठराव मंजूर झाला असून पश्चिम बंगालचे नामांतरण करत ‘बांगला’ असे करण्याचा ठराव पश्चिम बंगाल विधानसभेत ठेवण्यात आला होता. हे नामांतरण सर्व भाषांमध्ये करण्यात यावे असे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस सरकारने ठरावात म्हटले होते आणि हा ठराव मंजूर झाला आहे.

पश्चिम बंगाल विधानसभेत ठराव मंजूर झाल्याने आता गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात येईल. ठरावाला गृह मंत्रालयाने मंजुरी दिली तरच पश्चिम बंगालचे ‘बांगला’ असे नामांतर केले जाऊ शकते. विधानसभेत २०१६ मध्येही पश्चिम बंगालचे नामांतर करण्याचा ठराव मंजूर झाला होता. या ठरावानुसार पश्चिम बंगालचे नाव बंगालीमध्ये बांगला तसेच हिंदी आणि इंग्लिशमध्ये बंगाल असे करण्याचा प्रस्ताव होता. पण त्यावेळी या प्रस्तावाला काँग्रेस, भाजप आणि डाव्यांनी विरोध केला होता.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत