पश्चिम बंगाल मधील हिंसाचाराचा कर्जत भाजपाकडून जोरदार निषेध

कर्जत : अजय गायकवाड

पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या राज्यात सुडाचे राजकारण चालू झाले आहे. ठीक ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसचे गुंड हल्ले करीत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचे खून करणे, त्यांच्या घरांची जाळपोळ करणे, त्यांच्या दुकानांना किंवा व्यवसायाच्या ठिकाणाला आगी लावणे असे हिंसक प्रकार घडत आहेत. या हिंसाचाराच्या निषेधार्थ कर्जत भाजपाचे कार्यकर्ते शांततामय मार्गाने आंदोलन केले.

पश्चिम बंगाल मध्ये निवडणूक निकालानंतर भाजपा कार्यकर्त्यांवर सुडाचे राजकारण करून तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते हिंसक हल्ले करीत आहेत.त्याच्या निषेधार्थ भाजपा जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, रायगड जिल्हा चिटणीस रमेश मुंढे,कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल,भाजप किसान मोर्चाचे कोंकण विभागाचे सुनील गोगटे, कर्जत शहर अध्यक्ष नगरसेवक बळवंत घुमरे,नगरसेविका स्वामीनी मांजरे, विशाखा जिनगरे, मंदार मेहेंदळे आदींनी निषेधाचे फलक दाखवून शांततामय मार्गाने आंदोलन केले.नेरळ मध्ये भाजपा तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, नरेंद्र कराळे, नरेश जोशी, रोशन राणे, प्रकाश पेमारे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी भाजप महिला मोर्चा जिल्हा चिटणीस बिनीता घुमरे,भाजप महिला मोर्चा तालुकाध्यक्ष स्नेहा गोगटे, तसेच शर्वरी कांबळे, सुषमा ढाकणे, शारदा भंगाळे, अभिनय खांगटे, केशव तरे, मारुती जगताप, मनिषा अथनिकर, सरस्वती चौधरी, नेरळ जिल्हा परिषद गट अध्यक्ष संदीप म्हसकर, सर्वेश गोगटे, समीर घरलुटे, प्रशांत प्रभुणे, चांदभाई मणियार, बिलाल अढाळ आदी उपस्थित होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत