पश्चिम रेल्वेवर उद्या, १ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू

मुंबई  : रायगड माझा वृत्त 

पश्चिम रेल्वेवर उद्या, १ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले असून त्यात १० नवीन फेऱ्यांसोबतच १२२ फेऱ्यांचा विस्तार करण्यात आला आहे. त्याचा दृश्य परिणाम म्हणून दिवसभर चालणाऱ्या फेऱ्यांची संख्या १,३५५ वरून १,३६५ वर जाणार आहे. त्यापैकी ११० फेऱ्या हार्बर मार्गावर चालणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर दरवर्षी नवीन वेळापत्रक लागू केले जाते. त्यात प्रवाशांच्या मागणीचाही विचार केला जातो. उद्या, १ नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन वेळापत्रकात चर्चगेट ते डहाणूपर्यंत एक जलद फेरी, चर्चगेट ते विरारसाठी दोन फेऱ्या आणि विरार ते डहाणूपर्यंत एका नवीन धीम्या फेरीचा समावेश आहे. विरार ते चर्चगेटसाठी दोन, डहाणू ते विरारसाठी दोन, विरार ते बोरिवली आणि भाईंदर ते अंधेरीसाठी प्रत्येकी एक जादा फेरी सुरू केली जाणार आहे.

लोकल फेऱ्यांच्या वेळात बदल 

– डहाणू-चर्चगेट लोकल सायं. ५.३५ ऐवजी सायं. ५.५० वा. सुटेल.
– डहाणू-चर्चगेट लोकल सायं. ६.५५ ऐवजी सायं. ७.१० वा. सुटेल.
– ५६ लोकल फेऱ्यांच्या वेगात बदल
– २६ फेऱ्यांच्या वेगात वाढ
– एसी लोकलला मरीन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, दहिसर, मीरा रोड, नायगाव, नालासोपारा येथे अतिरिक्त थांबे.

महिला विशेष गाड्या
– चर्चगेटहून सुटणारी सायं. ६.५१ ची लोकल भाईंदरऐवजी विरारपर्यंत नेण्यात आली आहे.
– भाईंदरहून सुटणारी लोकल आता विरारहून स. ८.४४ वा. सुटेल.
– वसईहून सुटणारी स. ९.५६ ची लोकल आता विरारहून स. ९.४७ वा. सुटेल.
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत