पाऊण महिन्यापासून बेपत्ता असलेल्या विवाहतेचा अद्याप थांगपत्ताच नाही; नातेवाईकांची चिंता वाढली.

लहान मुलीचा आक्रोश , मिनाक्षी मोबाईल ही बंदच  

खोपोली : समाधान दिसले

दिवसेदिवस महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणी आला असून महिला बेपत्ता होण्याचे प्रकार ही सर्वाधिक आहेत. खोपोली शहरातून साईबाबानगर परिसरात वास्तव्यात असणाऱ्या कुटुंबातून किरकोळ वाद झाल्याने घरातून कोणालाही कल्पना न देता निघून गेल्याने रात्री उशिरा घरी न आल्याने नातेवाईकांनी शोधमोहीम घेतली असता कोठेच थांगपत्ता न लागल्याने पतीने आपली पत्नी हरवल्याची तक्रार दिली होती. या घटनेला जवळपास पाऊण महिना उलटूनही या विवाहते बाबत कोणताच तपास न लागल्याने नातेवाईकांची चिंता वाढली आहे, तर लहान मुलगी आई दिसत नसल्याने आक्रोश करीत आहे. तर तिच्याकडे असणारा मोबाईल ही बंद असल्याचे दिसत आहे. या बाबत खोपोली पोलिसांनाही या विवाहिते बाबत कोणतीच खबर मिळाली नसल्याचे समोर येत आहे.

 या घटनेची नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की मोठे वेणगाव कर्जत येथील सावंत कुटुंबातील मीनाक्षी हिचा सुधागड तालुक्यातील पिंपळोली येथील सुनील कळमकर यांच्याशी सात वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या दरम्यान त्यांना एक चार वर्षांची स्मरणिका ही मुलगी ही आहे. सुखात संसार सुरु असताना  मात्र 11  फेब्रुवारी रोजी पती सुनील यांच्या बरोबर मीनाक्षीचे किरकोळ भांडण झाल्याने दुसऱ्या सुनील लहान मुलगीला घेऊन पिंपळोली येथे गेले असता घरात मीनाक्षी एकटीच असल्याने 12  फेब्रुवारी रोजी घरातून निघून गेली. जातेवेळी मी घरातून निघून जात आहे, माझा राग शांत झाल्यानंतर परत येईन. मला शोधण्याचा प्रयत्न करू नका असा मोबाईलवर मेसेज करून फोन बंद केला. सदरचा मेसेज भावाला समजल्याने सर्व नातेवाईकांनी शोधण्यास सुरुवात केली, मात्र कुठेच थांगपत्ता न लागल्याने शेवटी पती व नातेवाईकांनी खोपोली पोलिसात मीनाक्षी हरवल्याची तक्रार दिली या घटनेला जवळपास पाऊण महिना उलटला असला तरी या विवाहते बाबत कोणतीच माहिती समोर न आल्याचे नातेवाईकांची चिंता वाढू लागली आहे.

मीनाक्षी हिचे वय 25 वर्षे, उंची 5 फूट,  रंग -गोरा, मध्यम बांधा सोबत लाव्हा कंपनीचा मोबाईल, गळ्यात सोन्याची मंगळसूत्र चैन अंगठी कानातील सोन्याचे दागिने आहेत.

हिला पाहिल्यास व कोणास काही माहिती मिळाल्यास खोपोली पोलीस ठाणे पोलीस कर्मचारी पी.आर.पाटील मोबाईल नंबर 9518348295 किंवा नातेवाईक भाऊ मंदार सावंत 7498427007 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत