पाककडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन, पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात २ चिमुरड्यांसह एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू

श्रीनगर : रायगड माझा वृत्त 

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात दोन चिमुरड्यांसह एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू, पाककडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानचे पंतप्रधान शांततेची भाषा करत असले तरी पाकिस्तानी सैन्याकडून मात्र वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. रात्री पाकिस्तानी रेंजर्सकडून केलेल्या गोळीबारात पूंछ जिल्ह्यातील एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैनिकांनी मोर्टारचे गोळे आणि बंदुकांच्या साहाय्याने सामान्य नागरिकांवर फायरिंग केली. पाकिस्तानी सैन्याकडून केलेल्या गोळीबारात रूबाना कौसर (24),त्यांच्या मुलगा फजान (5) आणि नऊ महिन्याची मुलगी शबनम हिचा मृत्यू झाला. या हल्ल्यात रुबानाचा पती मोहम्मद युनूस गंभीर जखमी झाला आहे. या घटनेच्या काही वेळ आधीच पूंछच्या मनकोट परिसरात केलेल्या गोळीबारात नसीमा अखतर नावाची महिला जखमी झाली.

सलोतरी आणि मनकोट याशिवाय पूंछ जिल्ह्याच्या कृष्णाघाटी आणि बालकोट परिसरात देखील गोळीबार केला गेला आहे. भारतीय जवानांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर त्यांनी काढता पाय घेतला. सलग आठव्या दिवशी पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. पाकिस्तानी सेनेने एका आठवड्यात 60 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत