पाककडून समझोता एक्स्प्रेस सुरू; लाहोरमधून १५० प्रवासी रवाना

लाहोर- दिल्ली : रायगड माझा वृत्त 

भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेली समझोता एक्स्प्रेस रेल्वे सेवा पाकिस्तानने आज, सोमवारी (दि.४) पुन्हा सुरू केली. आज लाहोर येथून रवाना झालेल्या या रेल्वेतून १५० प्रवाशी प्रवास करत आहेत, असे वृत्त पाकिस्तान रेडिओने दिले आहे.  दरम्यान, दिल्लीतून ही रेल्वे केवळ १३ प्रवाशांना घेऊन रविवारी अटारीकडे रवाना झाली. ही रेल्वे दुपारी अटारी येथे पोहचली.

दोन्ही देशांदरम्यान लाहोर ते दिल्ली अशी ही रेल्वे धावते. ही रेल्वे लाहोर येथून दर सोमवारी आणि गुरुवारी रवाना होते. तर दिल्लीतून दर बुधवारी आणि रविवारी ही रेल्वे लाहोरकडे रवाना होते. गेल्या गुरुवारी (दि.२८) या रेल्वेचा प्रवास थांबविण्यात आला. आता दोन्ही देशांदरम्यान ही रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत सहमती झाली आहे, असे दिल्लीतील रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत