पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारतीय सैन्य दलातील कॅप्टन जखमी

रायगड माझा
जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेचे उल्लंघन करीत पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा गोळीबार केला. पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय चौक्यांवर केलेल्या गोळीबारात भारतीय लष्करातील एक कॅप्टन जखमी झाला आहे.
पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेचे उल्लंघन करीत मंगळवारी सायंकाळी पुंछमधील चाकन दा बाग परिसरात गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय लष्करामधील एक कॅप्टन जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले असून भारत-पाकिस्तान यांच्यात सुरू झालेली ही चकमक मध्यरात्रीपर्यंत सुरू होती, अशी माहिती लष्करामधील एका अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, सोमवारी पुंछमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे एका मेजरसह ७ सैनिक ठार झाले होते. तसेच ४ सैनिक जखमी झाले होते.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत