पाकिस्तानची साखर नवी मुंबईत दाखल, साखरेचा भाव पडणार!

मुंबई :रायगड माझा

राज्यातील ऊस उत्पादक आणि साखर कारखाने संकटात असताना केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाकिस्तानची साखर दाखल झाली आहे. ही साखर येथील बाजार भावापेक्षा १ रुपयांनी कमी किमतीची आहे. जवळपास ६० ते ६५ लाख टन अधिक साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यातच मागच्या हंगामातील दोन ते अडीच लाख टन साखर पडून आहे. त्यामुळे आपल्याकडे साखरेचा एवढा मोठा साठा असताना पाकिस्तानची साखर का आयात करण्यात आली आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

 

गतवर्षीपासून किरकोळ बाजारात ४० ते ४२ रुपये किलो असलेले साखरेचे दर, दोन महिन्यांपासून खाली आले असून ३६.५० ते ३८ रुपये किलोवर स्थिर झाले आहेत. त्यातच सध्याचे साखरेचे भरमसाठ उत्पादन पाहता साखरेचे हे दर आणखी खाली येण्याची दाट शक्यता आहे. त्यातच पाकिस्तानची साखर बाजारात दाखल झाल्याने साखरेचे दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. येथील बाजाराभावापेक्षा पाकिस्तानची साखर एक रुपयांनी कमी आहे. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाकिस्तानच्या साखरेचे भरलेले ट्रक दाखल होत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत