पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा; ट्रोलरचे सानिया मिर्झाने केले तोंड बंद

सानिया मिर्झाला एका व्यक्तीने पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत  ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण नेहमीप्रमाणे सानिया मिर्झाने आपल्या शैलीत त्याला योग्य उत्तर दिले आहे.

sania-mirza
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने लग्न केल्याने तिला अनेकदा ट्रोलचा सामना करावा लागला आहे. पण दरवेळी ट्रोल करणाऱ्यांना सानिया मिर्झाने योग्य ते उत्तर देत त्यांचे तोंड बंद केल्याचे आपण अनेकदा पाहिले आहे. नुकतेच सानिया मिर्झाला ट्विटरवर एका व्यक्तीने पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण नेहमीप्रमाणे सानिया मिर्झाने आपल्या शैलीत त्याला योग्य उत्तर दिले आहे.

ट्वीटर पोस्ट पहा 

सानिया मिर्झाला @imsamkhiladi या ट्विटर अकाऊंटवरुन ट्रोल करत तुझा स्वातंत्र्य दिन आज असेल ना ? असा खोचक प्रश्न विचारत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. पाकिस्तानचा १४ ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आहे. ट्विटरकराला सानिया मिर्झाने सडेतोड उत्तर देत, उद्या माझा आणि माझ्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आणि आज माझा पती आणि त्याच्या देशाचा स्वातंत्र्य दिन. तुमचा गोंधळ मिटला असेल अशी अपेक्षा. पण तुमचा कधी आहे ? कारण तुम्हीच जास्त गोंधळलेले दिसत आहात, असे उत्तर दिले आहे. अनेकजण सानियाने दिलेल्या या सडेतोड उत्तराचे कौतुक करत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत