पाकिस्तानमधील मदरशात बॉम्बस्फोट; ७ जणांचा मृत्यू तर ७० जण जखमी

पेशावर : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

पाकिस्तानमधील पेशावरमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. पेशावरमधील दीर कॉलनीमधील मदरशात हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. या स्फोटात सात जणांचा मृत्यू झाला असून ७० जण जखमी झाले आहेत. यात मुलांचा जास्त समावेश आहे. हे वृत्त डॉन या वृत्तवाहिनीने दिलं आहे. तसेच जखमींना लेडी रिडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.

रुग्णालयाचे प्रवक्ते मोहम्मद आसीम यांनी सात मृतदेह आणि ७० जखमींना रुग्णालयात आणण्यात आलं असल्याची माहिती दिली आहे. बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांमध्ये बहुतांश मुलांचा समावेश आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, रुग्णालयात आणीबाणी जाहीर करण्यात आली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत