पाकिस्तानमध्ये अल्पवयीन मुलीचे धर्मांतरण करून लावला निकाह

कराची : रायगड माझा ऑनलाईन 

पाकिस्तानमध्ये हिंदू नागरिकांवरील अत्याचाराच्या घटना सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. येथील सिंध प्रांतात राहणाऱ्या एका 16 वर्षीय हिंदू मुलीचे समाजकंटकांनी अपहरण केले. त्यानंतर तिचे जबरदस्तीने धर्मांतरण करून तिचा निकाह एका मुस्लीम व्यक्तीशी लावून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. अनुषा मेघवार असे तिचे नाव आहे. दरम्यान अनुषावर झालेल्या अन्यायाविरोधात पाकिस्तानमधील सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे.

येथील सिंध प्रांतातील थारपारकर भागात 80 टक्के हिंदू आहेत. येथील हिंदू हलाखीचे जीवन जगत असून त्यांच्यावर पोलिसांकडून अत्याचार होत आहेत. हिंदू तरुणी व महिलांचे अपहरण करणे, त्यांच्यावर बलात्कार करणे. त्यांचे जबरदस्तीने धर्मांतरण करणे असे प्रकार येथे सातत्याने घडत आहेत. पण त्याची दखलच कोणी घेत नसल्याने येथे हिंदूंना कोणी वालीच नसल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान इमरान खान यांनी हिंदूंवर होणारे अत्याचार थांबलेच पाहीजे असे वक्तव्य केले होते. पण अनुषा घटनेमुळे खान यांचा खोटारडेपणाच उघड झाला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत