पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच तीन हिंदू उमेदवार निवडून आले

इस्लामाबाद : रायगड माझा वृत्त 

पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणूकीत तीन हिंदू उमेदवार निवडून आले आहेत. हे तीनही उमेदवार सिंध प्रांतातून निवडून आले आहेत. यापैकी एक जण नॅशनल असेम्बलीत तर दोन जण राज्याच्या विधानसभेत निवडून आले आहेत. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच खुल्या गटातून हे उमेदवार निवडणून आले आहेत.नॅशनल असेंबलीच्या थारपारकर या जागवरून महेश मलानी, तर प्रांतीय मतदार संघातून हरी राम किश्वरी लाल आणि जमशोरो ज्ञानूमल उर्फ ज्ञान चंद इसरानी हे निवडून आले आहेत. हे तीनही उमेदवार बेनझीर भुट्टोंच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीकडून निवडून आले आहेत. पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातले हे हिंदू उमेदवार मुस्लिम बहुल मतदार संघातून निवडून आले हे विशेष आहे.

 किश्वरी लाल मीरपुरखास जिल्ह्यातून निवडून आले आहेत. तिथे 15 लाख लोकसंख्येत 23 टक्के हिंदू आहेत. माजी राष्ट्रपती असीफ अली झरदारी यांचे ते जवळचे मित्र समजले जातात. इसरानी हे जामशेरो जिल्ह्यातून निवडून आले आहेत. त्यांनी विरोधी उमेदवार चंगेज खान यांचा पराभव केला. खुल्या जागांमधून हिंदू उमेदवार निवडून येणं ही चांगली गोष्ट असल्याचं मत पाकिस्तानातल्या हिंदू महासभेचे अध्यक्ष डॉ. गोविंद राम यांनी व्यक्त केल

औपचारिक आकडेवारी नुसार पाकिस्तानात 75 लाख हिंदू राहतात. अनौपचारिक आकडेवारी ही 90 लाखांच्या घरात असल्याचं हिंदू संघटनांचं मत आहे.पाकिस्तानात झालेल्या निवडणूकीत पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ या इम्रान खानच्या पक्षाला सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. अन्य पक्षांच्या मदतीने इम्रान खान सत्ता स्थापन करणार असून 11 ऑगस्टला ते पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत