पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांना बंदी : फवाद हुसैन

मुंबई : रायगड माझा वृत्त 

भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानने आता बॉलिवूडचे चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद हुसैन यांनी याबाबत माहिती दिली.

‘पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. तसेच भारतात चित्रीत झालेल्या जाहिरातींवरदेखील कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’ अशी माहिती वृत्तसंस्थांनी दिली.

पुलवामामध्ये भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडचे चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय भारतानं घेतला. तिथल्या चित्रपटसृष्टीच्या एकूण उलाढालीत ७०-८०% वाटा भारतीय चित्रपटांचा असतो. या निर्णयामुळं भारतीय चित्रपट निर्मात्यांचं काही प्रमाणात नुकसान होणार असलं तरी पाकिस्तानी सिनेउद्योगाला मात्र १०० कोटींचा फटका बसणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत