पाकिस्तानला दणका दिल्यावर भारतीय लष्कराने ट्वीट केली ‘ही’ कविता

नवी दिल्ली : रायगड माझा वृत्त 

पाकिस्तानला दणका दिल्यावर भारतीय लष्कराने ट्वीट केली 'ही' कविता

भारताच्या वायू सेनेने आज पहाटे पाकिस्तानमध्ये घुसून 200 ते 300 अतिरेकी ठार केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. भारताने एअर स्ट्राईक केल्याची माहीती पाकिस्तानकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारताकडून किंवा लष्कराकडून या बातमीला अद्याप दुजोरा मिळाला नाही. परंतु एअर स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन एक कविता प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही कविता सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. आज भारताने त्याचा बदला घेतला आहे. त्यानंतर भारतीय लष्कराने हिंदीतले प्रसिद्ध कवी रामधारी सिंह “दिनकर” यांच्या कवितेच्या ओळी ट्वीट केल्या आहेत.

‘क्षमाशील हो रिपु-समक्षतुम हुए विनीत जितना ही,

दुष्ट कौरवों ने तुमकोकायर समझा उतना ही।

सच पूछो, तो शर में हीबसती है दीप्ति विनय की,

सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की।’

 

कवितेचा अर्थ

जो दोषी आहे त्याला माफ करावं असं म्हटलं जातं. परंतु त्याला काही मर्यादा असतात. दुष्ट कौरव पांडवांना भेकड समजत होते. तसं तुम्ही आम्हाला समजू नका. असा इशारा या कवितेद्वारे भारतीय लष्कराने पाकिस्तानला दिला आहे. खरतर शरण येणे हेच विनयशीलतेचे लक्षण आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत