पाकिस्तानी राष्ट्रगीताचा सन्मान करणारे क्रिकेटपटू अटकेत

रायगड माझा

जम्मू काश्मीरमधील बंदिपुरा जिल्ह्यात एका क्रिकेटसामन्यादरम्यान पाकिस्तानच्या राष्ट्रगीतासाठी सन्मानार्थ उभे राहिलेल्या चार क्रिकेटपटूंना अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानचे राष्ट्रगीत बंदिपुरा जिल्ह्यातील अरीन गावात क्रिकेट सामन्यापूर्वी लावण्यात आले होते. यावेळी संघातील सर्व खेळाडू या राष्ट्रगीताला उभे राहिले. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चार क्रिकेटपटूंना अटक केली आहे. दरम्यान या स्पर्धेचे आयोजक कोण होते आणि याचा व्हिडिओ कोणी प्रसिद्ध केला, याचा शोध घेण्यात येत आहे. यापूर्वी २०१६ मध्ये गंदेरबाल जिल्ह्यात पाकिस्तानच्या राष्ट्रगीतादरम्यान स्थानिक क्रिकेटपटू सलाम करताना दिसून आले होते. आता पुन्हा एकदा पाकिस्तानच्या राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ क्रिकेटपटू उभे राहिल्याचे दिसून येत आहे. या सामन्याचे आयोजन तीन जानेवारीला करण्यात आले होते. प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओत ‘पाक सरजमीन’ हे राष्ट्रगीत सुरु असल्याचे ऐकू येत आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत