पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद

श्रीनगर : रायगड माझा वृत्त 

Image result for bhartiya javan

पाकिस्तानी सैन्याने सांबा जिल्‍ह्यातील रामगड सेक्टरमध्ये बीएसएफ जवानांवर हल्‍ला केला आहे. या हल्‍यात एक जवान शहीद झाला आहे. मंगळवारी बीएसएफचे काही जवान झाडे तोडण्यासाठी सीमेवर गेले होते. यावेळी अचानक पाकिस्‍तानी सैन्याने या जवानांवर गोळीबार केला.

पाकिस्‍तानी सैन्याच्या गोळीबारात एक जवान जखमी झाला. इतर जवान पाकिस्‍तान सैन्याला प्रत्‍युत्‍तर देत सुरक्षित ठिकाणी पोहले. त्‍याचवेळी एक जवान तेथेच राहिला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत त्‍या जवानाचा शोध घेण्यात आला परंतु, तो सापडला नाही. त्‍यानंतर रात्री उशीरा घटनास्‍थळी बेपत्‍ता जवानाचा मृतदेह मिळाल्‍याचे बीएसएफने सांगितले.

घटनेनंतर बीएसएफने या जवानाची माहिती सार्वत्रीक केली नव्हती. दुपारपर्यंत या घटनेची माहिती परिसरात पसरली होती मात्र, बीएसएफने याला दुजोरा दिला नव्हता. घटनेच्या काही वेळाने बीएसएफकडून मंगळवारी बीएसएफचे काही जवान झाडे तोडण्यासाठी सीमेवर गेल्‍याचे सांगण्यात आले.

या घटनेनंतर बीएसएफकडून रामगड सेक्टरमधील सुरक्षा वाढविण्यात आली असून, तेथील इलाख्याची तपासणी सुरु आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत