पाकिस्तान उच्चायोगातून २३ भारतीय पासपोर्ट गहाळ झाल्याने खळबळ

नवी दिल्ली : रायगड माझा ऑनलाईन

पाकिस्तान उच्चायोगातून २३ भारतीय पासपोर्ट गहाळ झाल्याने खळबळ उडाली आहे. पासपोर्टच गायब झाल्याने सुरक्षा यंत्रणाना अलर्ट करण्यात आले आहे. गहाळ झालेले बहुतांश पासपोर्ट शीख भाविकांचे आहेत. हे भाविक पाकिस्तानस्थित गुरुद्वारांना भेट देणार होते. यामध्ये करतारपूर साहिबचाही समावेश आहे. याच ठिकाणी गेल्या महिन्यात पाकिस्तानकडून  करतारपूर कॉरिडॉरचे भूमीपूजन करण्यात आले होते.

पासपोर्ट गहाळ झालेल्या भाविकांनी प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट गहाळ झाल्याने पाकिस्तान उच्चायोगाकडे दाद मागितली आहे. गुरुनानक यांच्या ५४९व्या जयंतीनिमित्त पाकिस्तानकडून ३ हजार ८०० शीख भाविकांना व्हिसा देण्यात आला आहे. नोव्हेंबर २१ ते ३० दरम्यान हा सोहळा होणार होता. पाकिस्तानने पासपोर्ट गहाळ होण्याची जबाबदारी फेटाळून लावली आहे.

दिल्लीतील  एका एजंटकडून २३ पासपोर्ट जमा करण्यात आले होते. ते पासपोर्ट पुढील प्रक्रियेसाठी पाकिस्तान उच्चायोगात जमा केले होते. प्रक्रिेया पुर्ण झ्राली आहे, की नाही हे पाहण्यासाठी ज्यावेळी तो एजंट पाकिस्तान उच्चायोगाकडे गेला त्यावेळी पासपोर्ट नसल्याचे सांगितले. अशी माहिती त्या एजंटने भारतीय अधिकाऱ्यांना दिली. शीख धर्मियांच्या भावना लक्षात घेऊन पाकिस्तानस्थित करतारपूर साहिबला भेट देण्यासाठी भारताकडून कोणतीही अट घातलेली नाही. हे ठिकाण भारतीय सीमेपासून हाकेच्या अंतरावर आहे. या सोयीचा पाकिस्तानकडून गैरवापर होण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने खासगीत बोलताना व्यक्त केली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत