पाकिस्तान पुन्हा हादरलं; बॉम्बस्फोटानं ३० ठार, ४० जखमी

पेशावर : रायगड माझा ऑनलाईन कराचीपाठोपाठ खैबर पख्तुनख्वा प्रांतात शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटानं पाकिस्तान हादरलं आहे. कराचीतील चिनी दूतावासाजवळ सकाळी बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्याची घटना ताजी असतानाच दुपारच्या सुमारास खैबर पख्तुनख्वा प्रांतातही शक्तिशाली बॉम्बस्फोट झाला. यात ३० जण ठार झाले. तर ४० जण जखमी झाले आहेत.

ओराकझाई जिल्ह्यातील कालाया परिसरात इमामबर्गाहजवळ जुमा बाजारात (फ्रायडे मार्केट) हा शक्तीशाली स्फोट झाला. यात किमान ३० नागरिक ठार झाले. तर ४० जण जखमी झाले, अशी माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. स्फोटातील मरण पावलेले अनेक नागरिक शिया मुस्लीम समाजाचे आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. स्फोटानंतर परिसराला घेराव घातला असून, तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. कराचीमध्ये चिनी दूतावासाजवळील स्फोट आणि त्यानंतरच्या ओराकझाई बॉम्बस्फोटानंतर खैबर पख्तुनख्वा पोलिसांनी अॅलर्ट जारी केला आहे. ‘शत्रूंना आमच्या प्रांतातील शांतता पाहावत नाही,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री मेहमूद खान यांनी दिली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत