पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ.सासरच्या मंङळीविरोधात तक्रार

खालापूर : मनोज कळमकर 

घराचे बांधकामासाठी पाच लाख रुपयांची केलेली मागणी पूर्ण न केल्यामुळे विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करणारा पती नितिन गणेश भगत,सासू कमळा गणेश भगत व नणंद शर्मिला गणेश भगत(सर्व रा. रेनायसेस व्टिन, तक्का पनवेल) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खालापूर पोलीस ठाणे हद्दीत महिला फिर्यादी सपना नितिन भगत वय-30, रा.तक्का पनवेल, सध्या रा. हातनोली, ता.खालापूर) यांचे 2016मध्ये नितिन भगत यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर काहि दिवसात सपनाचा पती गणेश,सासू व नणंद तिच्याकडे घर बांधणीसाठी माहेरहून पाच लाख रूपये आणण्यासाठी छळ करत होते.परंतु सपनाची घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे ती पाच लाखांची मागणी पूर्ण करत नव्हती.याच रागातून पती,सासू व नणंद वेळोवेळी शिवीगाळी करून, हाताबुक्क्याने मारहाण करून, मारण्याची धमकी देत मानसिक व शारीरिक छळ करत होते.दोन वर्ष सासरच्या जाचाला कंटाळलेल्या सपनाने खालापूर पोलीस ठाणे गाठत पती,सासू व नणंदे विरोधात तक्रार दिली आहे.याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात भादवि कलम 498-अ,323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जमील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक अंबिका अंधारे ह्या करीत आहेत. मनोज कळमकर-खालापूर प्रतिनिधी-
शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत