पाटीदार आरक्षण हिंसा : हार्दिक पटेलला दोन वर्षाची शिक्षा

नवी दिल्ली : रायगड माझा 

पाटीदार आरक्षणाच्या मागणीवरून विसनगरचे आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयात केलेल्या तोडफोड प्रकरणात हार्दिक पटेल आणि लालजी पटेल यांना विसनगर न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने दोघानांही दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

मेहसाणामधील विसनगर येथे २०१५ साली झालेल्या पाटीदार समाजाच्या आंदोलनादरम्यान आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी न्यायालयाने हार्दिक पटेल आणि लालजी पटेल यांना दोषी मानत २ वर्षाची शिक्षा दिली आहे. शिवाय प्रत्येकी ५० लाखांचा दंडही ठोठावला आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत