पाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत म्हणाला 2 लाख कर्ज आज माफ झाले! बच्चू कडूंनी शेअर केला व्हिडीओ !

मुंबई : महाराष्ट्र NEWS 24 वृत्त

Image result for बच्चू कडू TWITTER

राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जाच्या डोंगराचा भार हलका करण्यासाठी महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला आणि शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळाला असून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यासंदर्भात एक भावूक व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये एक शेतकरी रडताना दिसत असून त्याला रडण्याचे कारण विचारले असता 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ झाल्याचे तो सांगतो. कर्ज उरावर बाळगताना झालेल्या वेदना आणि आता कर्जमाफ झाल्यानंतर शेतकऱ्याचे पानावलेले डोळे सर्व काही सांगून जात आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वायरल होत आहे. एसटीमध्ये रडणाऱ्या व्यक्तिला कारण विचारल्यावर पाणावलेल्या डोळ्यांनी तो हसत बोलला 2 लाख कर्ज होते. आज माफ झाले धन्यवाद महाविकास आघाडी सरकार.., असं ट्वीट बच्चू कडू यांनी केलं आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत