पाण्याच्या दोन बाटल्या दिल्या, महिला वेटरला मिळाली सात लाख रुपयांची टीप

Related imageवॉशिंग्टन : रायगड माझा ऑनलाईन 

 

हॉटेल आणि बारमध्ये गेल्यावर बिल दिल्यानंतर वेटरला आपण टीप म्हणजे छोटी रक्कम देतो. जी आपण वेटरच्या सर्विसवर खुश होऊन दिलेली असते. ही टीप साधारणत: पाच रुपयांपासून शेकडो रुपयांपर्यंत असू शकते. पण अमेरिकेतील ग्रीनविले येथील सपडॉग्स रेस्टॉरंटमध्ये एका ऐलेना नावाच्या महिला वेटरला एकाने शंभर दोनशे रुपये नाही तर चक्क सात लाख रुपयांची टीप दिली आहे. एका यूट्यूब ब्लॉगर जिम्मी डॉनल्डसनने दिली आहे.

काही दिवसांपूर्वी जिम्मी सपडॉग्स रेस्टॉरंटमध्ये काहीवेळासाठी आले होते. त्यांनी ऐलेनाला फक्त दोन पाण्याच्या बाटल्यांची ऑर्डर दिली होती. तिने पट्कन दोन बाटल्या त्यांच्या टेबलावर ठेवल्या व ती निघून गेली. त्यानंतर जिम्मी यांना अजून काही हवे आहे का हे पाहण्यासाठी ती पुन्हा त्यांच्या टेबलावर आली. पण जिम्मी तेथे नव्हते. मात्र टेबलावर टीप ठेऊन ते निघून गेले होते. एवढी टीप बघून ऐलेनाला धक्काच बसला. कारण जिम्मी यांनी शे- दोनशे रुपये नाही तर चक्क 10,000 डॉलर म्हणजे सात लाख रुपये टीप म्हणून ठेवले होते. जिम्मी मोठ्या मनाचे व्यक्ती असल्याचे जगप्रसिद्ध आहे. यामुळे त्यांच्याकडून एवढी मोठी टीप मिळाल्याने ऐलेना भलतीच आनंदात आहे.

जिम्मी सोशल मीडियावर मिस्टर बीस्ट म्हणून लोकप्रिय आहेत. यूट्यूबवर त्यांचे ९ मिलियनहून अधिक सबस्क्रायबर आहेत. याआधी जिम्मीने एका पिझ्झा बॉयलाही 10,000 डॉलर टीप म्हणून दिले होते. विशेष म्हणजे ऐलेनाने या टीपमधील मोठी रक्कम स्वत:साठी ठेवली असून उर्वरित रक्कम तिने इतर वेटर्सला वाटली.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत