‘पानीपत’ चित्रपटातून पद्मिनी कोल्हापूरेंच कमबॅक

मुंबई : रायगड माझा ऑनलाईन 

Related image

बॉलिवूडमध्ये ८० चे दशक गाजवणारी अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापूरे. अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर असणाऱ्या पद्मिनी कोल्हापूरे  आता पुन्हा एकदा कमबॅक करणार आहेत. दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्या पानीपत या चित्रपटात त्या गोपिका बाईंची भूमिका साकारताना दिसतील.

पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर भाष्य करणारा चित्रपट ‘पानिपत- द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात नानासाहेब पेशवा यांच्या पत्नी असलेल्या गोपिका बाई यांची भूमिका पद्मिनी कोल्हापूरे साकारणार आहेत.

पानिपतच्या युद्धाचा थरार या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर, अभिनेत्री क्रिती सेनॉन वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत