पार्थ पवारांच्या उमेदवारीला शरद पवारांकडून ब्रेक? अजित पवारांचे मौन

रायगड माझा वृत्त

मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण खुद्द शरद पवारच पार्थ पवार यांच्या उमेदवारीबद्दल फारसे अनुकूल नसल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांनी थेट पार्थ पवारांच्या नावाला विरोध केला नसला तरी पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याना संधी कधी मिळणार? असा सवाल त्यांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना विचारला. एबीपी माझा वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. शरद पवारांच्या या भूमिकेवर अजित पवारांनी अजून तरी कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरु आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यातील किती जागांची मागणी करायची. मित्र पक्षांना आघाडी कसे सामावून घ्यायचे यावर या बैठकीत विचारमंथन सुरु आहे. स्वत:हा शरद पवारांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत