पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून प्रस्तावित काशीद जेट्टीची पाहणी

मुरुड जंजिरा: अमूलकुमार जैन

मुरूड तालुक्यातील काशीद येथे केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत होणाऱ्या प्रवासी जेट्टीची जागेची पाहणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली. या जेट्टीमुळे मुंबईकडून काशिदकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे.

रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळण्यासाठी काशीद समुद्रकिनारी सागरमाला प्रकल्पाअंतर्गत रोरो जेट्टी उभारली जाणार आहे. या प्रस्तावित जेट्टीची आज पालकमंत्री रविद्र चव्हाण यांनी भेट घेवून पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार प्रशांत ठाकूर, अलिबाग विधानसभा अध्यक्ष महेश मोहिते, महाराष्ट्र सागरी मंडळाचे सुधीर देवळे, मुरूड नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते. काशीद जेट्टीच्या उभारणीसाठी आणि अन्य सुविधांसाठी 112कोटी रुपये खर्चाचा प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुरुड काशीदकडे येणाऱ्या पर्यटकांना मुंबईहून थेट काशीद समुद्र किनाऱ्यावर येण्यास मिळणार आहे. या रो रो प्रकल्पामुळे काशीद तसेच मुरुडच्या परिसराला आर्थिक चालना मिळणार आहे. या प्रकल्पातंर्गत काशिद येथे रो-रो जेट्टी, ब्रेक वॉटर बंधारा, पार्किंग टर्मिनल इमारत, जोडरस्ता तसेच विद्युत आणि पाण्याची सोय करण्यात येणार आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत