पालघरच्या केळवे समुद्रात चौघे बुडाले, एक मृतदेह सापडला

पालघर : रायगड माझा वृत्त 

केळवे येथे पर्यटनासाठी आलेले चार पर्यटक सुमद्रात बुडाल्याची घटना आज (रविवार) दुपारी घडली आहे. हे पर्यटक नालासोपारा येथील होते. आज दुपारी दोन-अडीचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बुडालेल्या चौघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, तिघांचा शोध सुरु आहे.

शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस सुट्या आल्यामुळे येथे पर्यटकांची संख्या वाढली आहे. केळवा पोलीस ठाणे हद्दीतील दादरा पाडा समुद्र किनारी संतोष भुवन नालासोपारा पूर्व येथील गौरव भिकाजी सावंत (वय १७), संकेत सचिन जोगले (१७), देविदास रमेश जाधव (१६), दिपक परशुराम चालचाडी (२०), दिपेश दिलीप पेडणेकर (१७), श्रीतेज नाईक (१५), तुषार चिपटे (१५) ही ७ मुले पर्यटनासाठी आली होती. दुपारी अडीचच्या सुमारास हे सर्वजण समुद्रात पोहण्यासाठी गेले.  यातील चार जण बुडाले. यातील दिपक चालवाडीचा मृतदेह सापडला आहे. तर दिपेश पेडणेकर, श्रीतेज नाईक आणि तुषार चिपटे यांना शोधण्याचे काम सुरू आहे. पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत