पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड

पालघर : रायगड माझा

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत झाले .  तर 31 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. पालघरमध्ये चार ठिकाणी ईव्हीएममध्ये  बिघाड झाला आहे.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाकडून काँग्रेसमधून आलेले राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, काँग्रेसकडून दामोदर शिंगडा, माकपाकडून किरण गहला, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि इतर चार अपक्ष उमेदवार आहेत. शिवसेना-भाजपने पालघर पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे सगळ्यांचेच लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत