पालघरमध्ये भाजपकडून मतदारांना पैशाचे वाटप, शिवसैनिकांनी रंगेहाथ पकडले

पालघर : रायगड माझा वृत्त

 

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सध्या अंतिम टप्प्यात आहे. पालघरमध्ये पराभव समोर दिसू लागताच भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. मतदारांचा प्रतिकूल प्रतिसाद पाहून बिथरलेल्या भाजपने पैशाचं आमिष दाखवण्याचा उद्योग सुरू केला आहे.

मतदारांना पैसे वाटणाऱ्या काही जणांना शिवसैनिकांनी रंगेहाथ पकडले आहे. दिवसाढवळ्या हा पैसे वाटण्याचा कार्यक्रम सुरू होता. पालघरच्या रानशेत भागात हा सगळा प्रकार सुरू होता. शिवसैनिकांनी धाड मारून याबाबत पर्दाफाश केला. तसेच पोलिसांनाही याची माहिती दिली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार अमित घौडा उपस्थित होते. भाजपचे पालघर शहर अध्यक्ष अशोक आंबोरे यांनी आपल्याला पैसै घेऊन पाठवलं असल्याची कबुली पैसै वाटणाऱ्या व्यक्तीने दिली आहे. येत्या २८ मे रोजी पालघरमध्ये मतदान होणार असून शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्यात आली असून, राजेंद्र गावित हे भाजपचे उमेदवार आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत