पालघरमध्ये भूकंपाचा धक्का, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

रायगड माझा वृत्त

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी परिसर शुक्रवारी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. सकाळी सातच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला असून या भूकंपाची तीव्रता ३. ३ रिश्टर स्केल अशी नोंदवण्यात आली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून पालघरमधील डहाणू आणि तलासरी येथे भूकंपाचे धक्के बसत आहे. शुक्रवारी सकाळीही भूकंपाचा धक्का बसला. यामुळे काही काळ गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वी २४ जानेवारी रोजी सकाळी ९.१३ आणि ९.१५ वाजता डहाणू व तलासरी परिसरात भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल अशी नोंदवण्यात आली होती.

भूकंपाची तीव्रता कमीच
गेल्या दोन महिन्यांपासून भूगर्भातील हालचालींचे गडगडाटी आवाज येत असून ते अद्यापही सुरूच आहेत, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतचा हा संपूर्ण भाग आदिवासीबहुल आहे. परिणामी, त्या भागातील पक्या घरांच्या भिंतीना, इमारतींना तसेच कुडाच्या घरांना कमी-अधिक प्रमाणात तडे गेलेले आहेत. शुक्रवारी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता कमीच होती, यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत