पालघरमध्ये १५ वर्षीय मुलीवर १२ वर्षीय मुलाकडून बलात्कार

पालघर : रायगड माझा ऑनलाईन 

पालगर जिल्ह्यातील मोखाडा येथील दांडवळ गावात बलात्काराचा गंभीर प्रकार उघडकीस आला. एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडीत मुलीला त्रास होत असल्याने तिला मोखाडा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर पीडीत मुलगी ४ महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले.

पीडीत मुलीला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे.जे रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. आरोपी फरार असून आरोपीविरोधात पोस्को कायद्याअतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मोखाडामध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत