पालघरात बहुजन विकास आघाडी भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता

मुंबई :रायगड माझा

राज्यात भंडारा आणि पालघर येथे येत्या २८ मे रोजी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार (१४ मे) शेवटचा दिवस अाहे. पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी (बविआ) ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेऊन भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

तसे झाल्यास शिवसेनेची पालघर मधली सर्व गणिते विस्कटण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीचे पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यामुळे तेथे पोटनिवडणूक होत आहे. पोटनिवडणुकीचा ज्वर वाढत असतानाच वनगा यांच्या कुटुंबीयानी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेनेने चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना लोकसभा पोटनिवडणुकीतही उतरवले. त्यामुळे भाजपाने घाईघाईत काँग्रेसमधून पक्षात दाखल झालेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली.बहुजन विकास आघाडीनेही या निवडणुकीत आपले पूर्वीचेच खासदार बळीराम जाधव यांना उमेदवारी दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून येथे दामोदर शिंगडा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बहुजन विकास आघाडी कायम सत्ताधाऱ्यांसोबत : हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा पालघर लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा क्षेत्रावर प्रभाव आहे. येथील तीनही आमदार त्यांच्याच पक्षाचे आहेत. पालघरमध्ये २००९ मध्ये बविआचा खासदार विजय झाला होता. आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर ठाकूर यांच्या बविआने कायमच सत्ताधारी पक्षाशी जुळवून घेतले आहे. शिवसेना आणि भाजपने मिळून एकच उमेदवार द्यावा, आम्ही उमेदवार मागे घेण्यास तयार आहोत, असे ठाकूर यांनी जाहीर केले आहे. पण ते ही अट सोडून भाजपसाठी उमेदवारी मागे घेण्याची शक्यता वर्तवली

भाजपने उमेदवार मागे घ्यावा, शिवसेनेची अट
भाजपचेच नाना पटोले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देताना भंडारा-गोंदियाच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तेथे पोटनिवडणूक होत आहे. येथे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेनेही येथे देवराज बावनकर यांना निवडणुकीत उतरविले आहे. भाजपने हेमंत पटले यांना उमेदवारी दिली आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून माघार घेण्याची तयारी शिवसेनेने दाखवली आहे. मात्र, यासाठी भाजपने पालघरमधील आपला उमेदवार मागे घ्यावा, अशी अट सनेने टाकली.
जात आहे.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत