पालघर तालुक्यातील विराथन (बु) ग्रामपंचायतीवर बहुजन विकास आघाडीचा झेंडा

पालघर : संदीप परदेशी (प्रतिनिधी)

पालघर तालुक्यातील विराथन (बु) या 9 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये 5 सदस्य शिवसेनेचे आणि 4 सदस्य बहुजन विकास आघाडीचे होते. आमदार श्री. राजेश रघुनाथ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन आणि माजी जिल्हापरिषद बांधकाम सभापती तसेच विद्यमान पंचायत समिती सदस्य सुरेश तरे यांच्या नेतृत्वात सेनेचे सरपंच श्री. शरद अनंत घरत आणि सदस्या श्रीमती. बेबी लक्ष्मण किणी यांनी आज बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेतला त्यामुळे विराथन (बु) ग्रामपंचायतीमध्ये बहुजन विकास आघाडीचे आता 6 सदस्य झाले आहेत.

यावेळी उपजिल्हा अध्यक्ष संदीप सावे, तालुका अध्यक्ष नागेश पाटील, बहुजन विकास आघाडीचे पी.टी.पाटील सर, बहुजन विकास आघाडीचे ॲड नितिन भोईर, वाकसई सरपंच उपेश भाऊ,तांदुळवाडी सरपंच रमेश चावरे,सफाळे सरपंच अमोध जाधव आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

सरपंच आणि सदस्या यांच्या या निर्णयामुळे आता विराथन बुद्रुक या गावातआनंदाचे वातावरण आहे. नवनियुक्त कार्यकारणी मुळे आता गावाच्या विकासाला अजुन वेग मिळण्याचे आणि अनुभवी मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचे हात अजुन बळकट झाले असल्याचे सदस्यांनी सांगितले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत