पाली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना व कॉंग्रेस युती

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षानी केली घोषणा !

पाली : विनोद भोईर

सुधागड तालुक्यात १४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक रणधुमाळीला आता रंग चढू लागला आहे. सोमवार, दिनांक  ७ मे पासून नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी पाली तहसील कार्यालयात सर्वपक्षीय उमेदवारांची गर्दी दिसत आहे. पाली ग्रामपंचायत निवडणुकीवर सर्वपक्षीय बहिष्कार टाकणार अशी चर्चा सर्वत्र असतांना त्यातून कॉग्रेस पक्ष बाहेर पडला असून कॉंग्रेसचे सुधागड तालुकाध्यक्ष अनिरुद्ध (बाबा) कुलकर्णी आणि शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांची त्यांच्या कार्यालयात पाली ग्रामपंचायत निवडणुकीबाबत मंगळवार दि.८ मे रोजी महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत पाली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिवसेना व कॉग्रेस सर्व जागा युतीने लढविणार असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जिल्हापरिषद सदस्य रविद्र देशमुख, पाली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सचिन जवके, अविनाश शिंदे, संजूशेठ ओसवाल, संदेश सोनकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी सागितले की, आम्ही पाली ग्रामपंचायत निवडणुकीबाबत घेतलेला निर्णय हा प्रस्थापितांना हाटविण्यासाठी आहे. येथील प्रस्थापितांनी ग्रामपंचायत आपल्या ताब्यांत असतांना अनेक कामाच्या, बांधकामाच्या परवानग्यां देतांना पार्टी फंडाच्या नावाखाली लाखो रुपयांची लुट केल्याचा आरोप देसाई यांनी केला. तसेच आलेली पाली नगरपंचायत ज्यांनी घालविली त्यांना खरोखरच प्रयचित्त घ्यायचे असेल तर त्यांनी पाली ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकून दुसऱ्यांना संधी द्यावी.

कॉग्रेसचे सुधागड तालुकाध्यक्ष कुलकर्णी म्हणाले की पाली ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या बैठकीत मी देखील अग्रस्थानी होतो पण त्यावेळी अस ठरल होत की सदर निर्णयाविरोधात तात्काळ न्यायालयात जायचं त्याकरिता कमिटी देखील तयार करण्यात आली परंतु ठरल्याप्रमाणे काही झाल नाही फक्त आम्हांला गोलमाल करण्याचंच काम चालू होत. यांनी आमची देखील फसवणूक केली. म्हणूनच आम्ही यांना धडा शिकविण्यासाठी आम्हाला समोर दिसणाऱ्या शिवसेने बरोबर युती करून पाली ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून पाली ग्रा.प.निवडणुकीवर बहिष्कार टाकणारे किती दिवस आपल्या निर्णयावर ठाम राहतील ते बघूच. याच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीमध्ये विकास कामाच्या नावने बोंबच होती आणि आजही आहे. मुलभूत सोयीसुविधा पासून जनतेला वंचित ठेवण्याचे काम या मंडळींनी केले असून यावेळी पालीतील सुज्ञ मतदार यांना यांची जागा दाखवितील .

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत