पाली नांदगाव मार्गावर टेम्पो व मोटारसायकलचा अपघात,मोटारसायकलस्वार जागीच ठार

रायगड माझा वृत्त : पाली 

पाली नांदगाव मार्गावर शुक्रवारी सायंकाळी मोटारसायकलची टेम्पोला धडक बसून अपघात झाला. या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. यामध्ये मोटारसायकल जळून खाक झाली.

तरणखोप पेण येथून सुधागड तालुक्यातील नागशेत गावात गणपतीच्या मुर्ती निलेश सुधाकर पाटील घेवून आले होते टेम्पोतून  .गणेशमुर्ती उतरवून शुक्रवारी सायंकाळी परत पेण येथे जाण्यास निघाले होते. यावेळी नांदगाव बाजूकडे येणारा मोटारसायकलस्वार मंगेश अंकुश वाघमारे राहणार दांड नांदगाव बसस्टॉपजवळ विरुद्ध बाजूला जावून टेम्पोला धडकला. या अपघातात मंगेश गाडीवरुन उडून पाठीमागे रोडवर पडून गंभीर दुखापत झाल्याने मृत झाला. त्याचवेळी मंगेशच्या मोटारसायकलने अचानक पेट घेतला.

 

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार पि.डी.पाटील करीत आहेत.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.