पावसाअभावी कापसाची पिके धोक्यात; दुबार पेरणीचे संकट

जालना : गणेश जाधव 

पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले तरीही एकही चांगला पाऊस पडला नाही. जेमतेम पडलेल्या हलक्या पावसावर शेतकऱ्यांनी लागवड केल्याली पिके आता कोमेजून जात आहेत. अंकूरलेल्या कपाशी बियांनाचे कोम बाहेर पडुन अंकुर फुलण्याअगोदर दुष्काळाच्या चटक्यात सापडुन जळून खाक होऊ लागल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने या कपाशीवर वखर फिरवले. अपुऱ्या पावसामुळे काही दिवसापूर्वी दुबार पेरनी केलेली पिकेही धोक्यात सापडली.

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील शेतकरी विनोद पिंगळे यांनी त्यांच्या वडीगोद्री व सौंदलगाव शिवारातील 10 एकर वर जुलै महिन्याच्या सुरवातीला कपाशी लागवड केली होती. रिमझिम पाऊस पडला असल्याने त्या ओलीवर कपाशी ची लागवड केली. ती चांगली उगवून ही आली. मात्र नंतर एक ही समाधानकारक पाऊस न आल्याने ती कपाशी कोमेजून व जळून जाऊ लागली. पावसाच्या या लहरीपणा मुळे उभे पीक जळून जात असल्याने विनोद पिंगळे यांनी अखेर आज या कपाशीवर ट्रॅक्टरच्या वखराणे ही कपाशी मोडून टाकली.

दुष्काळवाडा होऊन बसलेल्या अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात यंदा एकही पाऊस पडला नाही. महिना लोटला, दीड महिना लोटला, दोन महिने होत आले, पंढरीची वारी परत फिरली तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी सर्वसामान्यांचा जीव टांगणीला लागलाय. जो तो नशिबाला दोष देतोय. तर कोण पाप-पुण्याची भाषा करतोय. कोणी देवाला शिव्या-शाप देतायत, तर कोणी विनवण्या करतोय. कुठे देव पाण्यात ठेवले जात आहे तर कुठे धोंडी मागितली जातेय, परंतु पाऊस काही येत नाही. गेल्या दोन दशकांमध्ये बघितले तर पाच-सात वर्षात एकदा चांगला पाऊस होतो. गेल्या पाच ते सात वर्षांपासून मराठवाड्यामध्ये पावसाने पाठ फिरविली. वक्रदृष्टी ठेवली त्यामुळे तलाव कोरडेठाक पडले. विहीरीत पाण्याचा पत्ता नाही, बोअरवेल कधीच आटून गेले, शेतीसाठी सोडाच पण माणसांना व जनावरांना भर पावसाळ्यात पिण्यासाठी पाणी नाही. शेतकर्‍यांनी अशा स्थितीत पुन्हा मशागत केली, शेत कसलं, घामाचं रक्त ओकलं. आता पावसाची गरज पण पाऊस काही येत नाही.

जुन महिन्यात जेमतेम पावसाच्या सऱ्या कोसळल्या शेतातील नांगरटीचे ,वखाराने निघालेले ढेकुळ सुध्दा फुटले नसतांना पाऊस येईल. आल्याशिवाय राहतो का? नाही आलातर अधुनमधून निदान रिमझिम तरी पाऊस येईल? त्यावर पिक तगेल या भोळयाभाबाडया आशेने शेतकऱ्यांनी पेरणी केली आणि पावसाचे टिपुर सुद्धा पडलं नाही. शेतकऱ्यांच्या डोळयासमोर पिकाचा धुराळा उडाला. खरिपातील सोयाबीन, तुर,मुग,कापूस, बाजरी, सर्वच पिके हातचं गेली. परंतु शेतकऱ्यांनी धिर सोडला नाही. तो खचला पण नाही. उम्मेद जागी ठेवत पुन्हा जुलैच्या शेवट पाऊस पुन्हा एकदा अत्यल्प पडला दोन्ही पावसाने काळया रानातील ढेकुळ पण हालला नाही. तरीही शेतकऱ्यांनी दुबार पुन्हा पावसावर आस ठेवून दुबार पेरणी केली. पुन्हा पाऊसच गायब होऊन बसला शेतात टाकलेले दोनदा बियांचे खत होऊन बसले आत्ता उन्हाळयापेक्षा कडक उन व सोसाटयाचा वाऱ्याने शेतकरी हवालदिल होऊन बसले.

शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत